Latest Marathi News

BREAKING NEWS

खासदार राहुल शेवाळेंच्या अडचणी वाढल्या, मोक्का ही लावा होतेय मागणी

0

कथित प्रेमसंबंधं प्रकरणी चर्चेत आलेले शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहे. शेवाळे यांच्यावर एका महिलेने अत्याचाराचे आरोप केले होते. तर त्या महिलेचे दाऊदशी संबंध होते असा खुलासा शेवाळे यांनी केला होता. त्यानंतर आता कोर्टानेच शेवाळे यांना प्रतिसवाल करत या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. काही दिवसांपूर्वी शेवाळे त्यांनी पत्रकार परिषेद घेऊन सदर महिलेला पाकिस्तानी एजंट ठरवले होते.

त्यावरून आता याप्रकरणी न्यायाधिश यांनी गंभीर दखल घेत या प्रकरणी तातडीने सरकारी वकिलांची नियुक्ती करण्यात यावी असे आदेशच राज्य सरकारला दिले आहेत. मात्र दुसरीकडे सदर महिलेनेराहुल शेवाळे हे कितीवेळा पाकिस्तानमध्ये गेले होते त्यांचे कोणाशी संबंध आहे असा आरोप लावून एकाच खळबळ उडवून दिली होती तसेच विरोधकांनी सुद्धा हा विषय उचलून धरला होता.

याच पार्श्वभूमीवर खासदार शेवाळे यांचे दाऊदशी संबंध असल्याने त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप भालेकर यांनी केली आहे. याप्रकरणी त्यांनी न्यायालयाकडे एक तक्रार दाखल केली होती. तसेच या आज राज्य सरकारला दिलेल्या निर्देशानुसार याप्रकरणी तातडीची सुनावणी होईल असेही संकेत मिळत आहेत

Leave A Reply

Your email address will not be published.