Latest Marathi News

BREAKING NEWS

पॅरालिम्पिकपटू स्वरुप उन्हाळकर यांना चॅम्पियन स्पर्धेसाठी चंद्रकांतदादांनी दिल्या शुभेच्छा

0

कोल्हापूर |

३ नोव्हेंबरपासून दुबई येथे होणाऱ्या पॅराशूटिंग वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी पॅरालिम्पिकपटू स्वरुप उन्हाळकर रवाना होत आहे. तत्पूर्वी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील निवासस्थानी भेट झाली. पॅरा शूटींग प्रकारात स्वरुप उन्हाळकर सहभागी होणार आहे, या शूटिंग प्रकारामध्ये उन्हाळकर यांनी आपले नावलौकिक कमावले आहे.

चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी त्याला चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्ण कामगिरीसाठी स्वरूप उन्हाळकर यांना शुभेच्छा दिल्या आहेत. स्वरुप महावीर उन्हाळकर, कोल्हापूर (खेळ-पॅरा शुटिंग-10 मीटर रायफल) याने कोल्हापूरचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.