Latest Marathi News

BREAKING NEWS

‘या’ राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, शाळा-महाविद्यालयांना दिली सुट्टी

0

हवामान बदलामुळे दिल्लीच्या तापमानात हलकी घट झाल्याचे दिसून आले आहे, तर दुसरीकडे दक्षिणी राज्यांमध्ये अवकाळी पावसाचे सत्र सुरुच आहे. काही टेकड्यांवरील भागांवर बर्फवृष्टीही पाहायला मिळत आहे.हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, श्रीलंकेच्या किनार्‍याजवळ नैऋत्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे आज काही राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान विभागानुसार, देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत 11 नोव्हेंबरला कमाल तापमान 16 डिग्री आणि किमान तापमान 29 डिग्री असणार आहे. याशिवाय सकाळी दाट धुकेही दाटले जातील. तर, प्रदुषणाबाबत बोलायचे तर दिल्लीच्या आनंदविहार स्टेशनवर गुरुवारी संध्याकाळी 7 च्या जवळपास AQI 362 नोंदविण्यात आले आहे. जे फार दुषित वर्गात गणले जाते.

उत्तरप्रदेशची राजधानी लखनऊमध्ये आज कमाल तापमान 18 डिग्री आणि किमान तामपान 30डिग्री नोंदविण्यत आले आहे. तर सकाळच्या वेळेत इथे धुके दाटून आले होते. याशिवाय, गाझियाबादमध्ये कमाल तापमान 15 डिग्री आणि किमान तापमान 29 डिग्री नोंदविण्यात आले आहे. गाझियाबादमध्येही धुकेमय वातावरण असणार आहेत. तर प्रदुषणाबाबत बोलायचे तर गाझियाबादच्या लोणी स्टेशनवर AQI 309 नोंदविण्यात आले आहे.

हवामानाची माहिती देणाऱ्या स्कायमेटच्या अंदाजानुसार, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडुत पावलाच्या हलक्या सरी तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने आज इथल्या शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहिर करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.