Latest Marathi News

BREAKING NEWS

अशा दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, त्यासाठी निधीची अजिबात कमतरता पडू दिली जाणार नाही – चंद्रकांत पाटील

0

पुणे |

नवले ब्रिज वर पुन्हा अपघातांची मलिक सुरु आहे. नुकताच तेथे एक मोठा अपघात घडला. जवळपास ४८ गाड्या एकमेकांवर धडकल्या. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या अपघातांची मालिका थांबवण्यासाठी पुण्याचे पालकमंत्री तथा तंत्र व शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पुणे जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची आढावा बैठक झाली. यामध्ये नवले पुलावरील वाढते अपघात कमी करण्याबद्दलच्या उपाययोजनांवर सविस्तर चर्चा केली. अशा दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, त्यासाठी निधीची अजिबात कमतरता पडू दिली जाणार नाही, असे निर्देश चंद्रकांत पाटील यांनी दिले. चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन त्याविषयी माहिती दिली. 

चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांना माहिती दिली कि, वारंवार होणाऱ्या अपघातामुळे नवले ब्रिजवर नॅशनल हायवेने काही उपाययोजना केल्या त्यानंतर मागील तीन वर्षाच्या अपघाताचे प्रमाण हे खूपच कमी होते. परंतु परवा जो अपघात झाला तो अतिशय भयंकर होता. सर्व यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आहेत. प्रथम प्रशासनाची एक बैठक झाली त्यानंतर आज माझ्या उपस्थितीत एका अर्थाने प्रशासनाने केलेल्या उपाययोजना त्याला लागणार निधी आणि त्याचे वेळाप्रत्रक यासाठी हि बैठक झाली. एक एजन्सी जी अशा प्रकारच्या नॅशनल हायवेवर होणाऱ्या अपघातांवर काम आणि उपाययोजना करते त्यांनी खूपच सखोल असा त्यादिवशीच्या अपघातावर अभ्यास केला.  वारंवार होणाऱ्या अपघातांची कारणं तपासली. त्यांनी काही मार्ग सांगितले. निधीचा जराही विचार न करता ताबडतोब कामाला सुरुवात केली आहे. नजीकच्या काळामध्ये परमेश्वर करो आणि प्रशासनाचे प्रयत्न यातून कुठलीही दुर्घटना होऊ नये असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. 

चंद्रकांत पाटील यांनी पुढे माहिती दिली कि,  हा अपघात  जवळ जवळ नऊ महिन्यांनी झाला. आम्ही  एजन्सीला त्यावर काम करण्यास सांगितले. त्यांनी सगळी माहिती काढली आणि त्यावेळचे फुटेज तपासून त्यांनी खूप त्यावर अभ्यास केला. त्यानुसार त्यावर मार्ग म्हणून अवजड  वाहनांसाठी एक राईट ट्रॅक सात किलोमीटर अंतराचे  असावं, स्टार्टींग पॉइंटला चेकपोस्ट असावा, त्यामार्गावर अनाऊन्समेंन्ट  व्यवस्था करावी, वेगवेगळ्या भाषेतील साइन बोर्ड तयार करावेत , असे काही मार्ग या बैठकीत काढण्यात आलेले आहेत. 

यासोबतच या ठिकाणी पादचाऱ्यांसाठी क्रॉसिंगची सोय नाही, त्यामुळे तेथे एक ब्रिज तयार करण्यात येईल असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. जेणेकरून  पादचाऱ्यांना, ज्येष्ठ नागरिकांना क्रॉसिंग करणे सोयीस्कर होईल. आम्ही अशा प्रकारचे अपघात टाळण्यासाठी जवळपास दहा बारा पर्याय काढले आहेत, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.  

या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पुणे मनपा अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गचे अधिकारी, वाहतूक शाखेचे अधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.