मुंबई |
भाजपचे वरिष्ठ नेते तथा उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दादर (मुंबई) येथील अखिल भारतीय मराठा महासंघाच्या कार्यालयाला भेट देऊन राज्यभरातून आलेल्या मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली.
यावेळी चंद्रकांत पाटील यांचा सत्कार करताना अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष अॅड. शशिकांत अप्पा पवार, महासंघाचे नेते दिलीप दादा जगताप शेतकरी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजीराव दहातोंडे पाटील, अखिल भारतीय मराठा महासंघाचे उपाध्यक्ष संतोष नानावटे, व इतर पदाधिकारी उपस्थित होते. चंद्रकांत दादा पाटील यांनी अॅड. शशिकांत अप्पा पवार यांच्या निवासस्थानी भेट देऊन सुमारे तासभर विविध विषयावर चर्चा केली.