Latest Marathi News

BREAKING NEWS

अभिमान श्री नगरात गळफास घेऊन तरूणाने केली आत्महत्या

0

सोलापूर |

सोलापूर शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. राहत्या घरात एका १८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ओम संजय मोरे वय १८ (राहणार अभिमान श्री नगर सोलापूर) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

बुधवारी सायंकाळच्या सुमारास राहत्या घरी अज्ञात कारणातून ओढणीच्या सहाय्याने फॅनला गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळून आल्याने त्यास खाली उतरून पोलीस नाईक सचिन घुगे नेमणूक फौजदार चावडी पोलीस ठाणे यांनी बेशुध्द अवस्थेत यादीसह उपचारासाठी सोलापूर शहरातील शासकीय रुग्णालय दाखल केले असता उपचारापूर्वीच मृत्यू झाला आहे. या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकी येथे झाली असून आत्महत्या करण्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.