Latest Marathi News

BREAKING NEWS

“अंबिका योग कुटीर शाखा बार्शी यांच्याकडून औषध उपयोगी वृक्ष लागवडीचा शुभारंभ…!”

0

बार्शी |

बार्शी शहरांमध्ये प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून अंबिका योग कुटीर ठाणे. शाखा- बार्शी यांच्यामार्फत यशोदा नगर कासारवाडी रोड बार्शी येथे औषध उपयोगी वृक्ष लागवडीचा शुभारंभ सुधीर बापू बारबोले यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

पर्यावरण संरक्षण व संवर्धन हे योग साधनेला पूरक व आवश्यक आहेत, या सर्व गोष्टी लक्षात घेऊन परमपूज्य निकम गुरुजी यांनी बेलापूर या ठिकाणी वनऔषधी केंद्र सुरू केले. त्याचीच प्रेरणा घेऊन बार्शी येथे औषध उपयोगी वनस्पतीची लागवड करून उपक्रम राबविण्यात आला. यावेळी अंबिका योग कुटीर शाखेच्या शिक्षकांनी सर्वप्रथम श्रमदान केले, आयुर्वेदिक उपचारासाठी आवश्यक असलेली निसर्ग वाटिका तयार करण्यात आली.

या कार्यक्रमाला जेष्ठ योगशिक्षक बरडे गुरुजी, योगशिक्षक डॉ.प्रसाद कुलकर्णी यांच्यासह सर्व योग शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निसर्गवाटीकीच्या कार्यक्रमासाठी गजानन चेट्टी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.