Latest Marathi News

BREAKING NEWS

कौतुकास्पद | विधवा सुनेची सासू झाली आई लावून दिले तीच दुसरं लग्न

0

एकीकडे मुलाचे निधन झालेले असताना त्यांच्या पत्नीचे आपल्या मागे काय होणार तसेच तिच्या भविष्याचा विचार करून सासूच्या जागी आईचे कर्तव्य निभावणाऱ्या सासूचे सर्व स्थरातून कौतुकहोत आहे. अवघ्या ३२ वर्षांच्या मुलाचे निधन झाल्यानंतर स्वत:चे दु:ख बाजूला ठेवून सुनेच्या भविष्याचा विचार करत सासूने मुलीप्रमाणे सांभाळ केलेल्या सुनेचा पुनर्विवाह केला. सदर घटना पुणे येथील असून पतीच्या निधनानंतर विधवा सुनेच्या पुनर्विवाहासाठी सासूनेच पुढाकार घेऊन वेगळा आदर्श निर्माण केला

. सुनेचे समुपदेशन करून योग्य वरदेखील मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. छाया लायगुडे- काटे असे सुनेचा पुनर्विवाह करणाऱ्या आदर्श सासूचे नाव आहे. त्यांच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. सासू- सुनेचे नातेदेखील प्रसंगी आई- मुलीच्या नात्यात रूपांतरित होऊ शकते. सर्वत्र भांडणे, कटकटी होत असतात. अशा घटनांना छेद देणारे प्रसंग समाजात घडत असतात. अशा परिस्थितीत सासूच आई बनून विधवा सुनेचे कन्यादान करते, हा क्षण खरोखरच स्तुत्य ठरत असतो. असाच एक विवाह सोहळा नुकताच पुण्यात झाला. सासूने सुनेचे कन्यादान करत आपल्या या कृतीतून आदर्श घालून दिला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील धायरी परिसरात राहणारे विशाल लायगुडे यांचा सहा वर्षांपूर्वी कावीळसदृश आजाराने मृत्यू झाला होता. त्यांच्या पश्चात आई छाया, पत्नी रश्मी आणि पाच वर्षांची लहान मुलगी असा परिवार आहे.विशाल यांच्या अकाली निधनाने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. ऐन तारुण्यात मुलगा गमावल्याचे दु:ख असताना छाया यांना विधवा सुनेच्या भविष्याची चिंता लागली होती. पोटच्या मुलीप्रमाणे त्यांनी सून रश्मी हिचा सांभाळ केला. पुनर्विवाहासाठी तिचे मन वळविले. अखेर चार महिन्यांपूर्वी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत पुण्यात रश्मी यांचा विवाह पार पडला.

Leave A Reply

Your email address will not be published.