मुंबई : आजपर्यंत ५२ एकदिवसीय सामने, ४२ टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये लेग स्पिनर असणाऱ्या युजवेंद्र चहल याने आयुष्याच्या एका नव्या सामन्याला सुरुवात केलेली आहे. सोशल मिडीयावर त्याने आपल्या एंगेजमेंटचे फोटो शेअर करून आपल्या फँन्सना सुखद धक्का दिलेला आहे.
चहलच्या होणाऱ्या बायकोचे नाव धनश्री वर्मा असे आहे. दोघांनी रोका सेरिमनीचे फोटोज देखील शेअर केले आहेत. चहलने आपल्या कॅप्शन मध्ये लिहिले आहे की “आम्ही दोघांनी आमच्या परिवारासोबत एकमेकांना होकार कळवला आहे.#रोकासेरेमनी असे लिहित त्यांनी सर्वाना आपल्या होणाऱ्या लग्नाविषयी कल्पना दिली. यानंतर त्यांच्यावर सर्वांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.
चहलचे टीममेट केएल राहूल, हार्दीक पांड्या तसेच भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली यांनी देखील दोघांना शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर भारताचा माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागने चहलला मजेशीर शुभेच्छा दिल्या आहेत, ‘वाह चहल, आपदा को अवसर में बदल डाला. बधाई हो.’ अशा शब्दात शुभेच्छा दिल्या आहे.
धनश्री वर्मा पेशाने डॉक्टर, कुरीओग्राफार आणि युट्युबर आहे. चहल देखील सोशल मिडीयावर कायम अँक्टीव्ह असतो. मध्यंतरी वडिलांच्या सोबत बनवलेले अनेक टिक-टॉक व्हिडीओज बरेच चर्चेत आले होते. धनश्री आणि चहलने याआधी जूम सेशन्स मध्ये अँक्टीव्ह होते.
We said “Yes” along with our families❤️ #rokaceremony pic.twitter.com/Sf4t7bIgQt
— Yuzvendra Chahal (@yuzi_chahal) August 8, 2020