Latest Marathi News

BREAKING NEWS

ड्रेनेज मधून वाहत असलेले पाणी ‘आप’ घेणार का अंगावर ?

0

सोलापूर |

सोलापूर शहरातील बाराइमाम चौक परिसरात ड्रेनेज मधून पाणी बाहेर वाहत होते. ड्रेनेज चे वाहत असलेल्या पाणीमुळे आजूबाजूच्या परिसरात दुर्गंधी पसरली होती ज्यामुळे नागरिक त्रस्त झाले झाले होते. ही बाब परिसरातील नागरिकांनी आम आदमी पक्षाचे इच्छुक उमेदवार जुबेर हिरापुरे यांच्या निदर्शनात आणल्यांनतर जुबेर हिरापुरे आणि युवाध्यक्ष निलेश संगेपाग यांनी सबंधित अधिकाऱ्यांना जाग आणले.

आणि त्वरित संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून तात्काळ ड्रेनेज मधून वाहत असलेले पाणी रोखण्यास भाग पाडले. ड्रेनेज मधून वाहत असलेले पाणी थांबल्याने परिसरातील नागरिकांनी जुबेर हिरापुरे यांचे कौतुक केले. यावेळी इच्छुक उमेदवार जुबेर हिरापुरे, युवाध्यक्ष निलेश संगेपाग, मल्लिकार्जुन पिलगेरी, जमील पल्ला, व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.