राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनात निधीवाटपावरून सध्या चांगलाच कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. सत्ताधारी आमदारांना अधिक निधी वाटप करतानाच विरोधी पक्षाच्या आमदारांना डावलण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
हेही वाचा- “जिल्हा परिषद शाळा परंडा येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न…!”
हेही वाचा- कोरोनात अडीच वर्षे घरात बसलेला हा कसला महाराष्ट्राचा कुटुंबप्रमुख !
दरम्यान, नाना पटोलेंनी निधीवाटपावरून विरोधी पक्षांची भूमिका मांडली. ते म्हणाले,“आमच्या लोकांनी काही चूक केलेली नाही. आमच्या मतदारसंघातल्या लोकांनीही काही चूक केलेली नाही. त्यामुळे आमच्या मतदारसंघातल्या सर्व आमदारांना निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करतो. तुमच्याकडे बहुमत आहे. बहुमताच्या आधारावर तुम्ही काहीही निर्णय घेऊ शकता”