Latest Marathi News

BREAKING NEWS

“शिवतारेंना माघार घेतांना कोणतं आश्वासन दिलं होतं,” ? शिवतारे अन् अजित पवारांनी केलं स्पष्ट

0

पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघात बंडाची भूमिका घेणारे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी आज सासवडमध्ये सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी सभा आयोजित केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर शिवतारे यांनी आपला बंड मागे घेत सुनेत्रा पवारांना बहुमताने निवडून आणणार असं विधान केलं. यातच ज्यावेळी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. त्यावेळी शिवतारे यांना एक आश्वासन दिलं होतं. ते आश्वासन जाहीर करण्यासाठी सासवडमध्ये सभा आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी म्हटलंय. त्याची आता सगळ्यांना प्रतिक्षा लागून राहिलीय. 

सुरूवातीला बंडाची भूमिका त्यानंतर जाहीर पाठिंबा असे का ? त्यावर शिवतारे म्हणाले की, २७ मार्चला माझी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली होती. त्यानंतर संघर्ष न करता आम्ही तहामध्ये सहभागी झालो. या तहामध्ये पुरंदरच्या विकासाच्या दृष्टीने जे मोठे प्रकल्प आहेत ते लवकरात लवकर पुर्ण करावे, अशा मागण्या मान्य केल्यात. मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पालखीतळ मैदानावर यावे आणि जनतेशी संवाद साधावा आणि आम्ही माघार का घेतली याविषयी सांगितले असल्याचे शिवतारेंनी म्हटलं.

शिवतारेंच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे उत्तर दिलं आहे. अजित पवार म्हणाले की, विजय शिवतारे यांनी एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर मी, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासह बसलो होतो. तेव्हा त्यांच्या भागातले महत्वाचे विषय मांडले. ते म्हणाले की मी महायुतीबरोबर आहे, पण ते विषय सरकारनं मार्गी लावायला हवेत. असं ते म्हणाले. त्याचवेळी त्यांनी सांगितलं होतं की मी एक दिवस सभा आयोजित करतो. त्या सभेला मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांनी यावं. तेव्हा आम्ही तसा शब्द दिला होता. त्यानुसार त्यांनी ११ तारखेला तिथल्या मैदानावर सभा आयोजित केली आहे. त्या सभेला मुख्यमंत्री व मीही जाणार नाही. असेही त्यांनी म्हटलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.