Latest Marathi News

BREAKING NEWS

विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचं तीस-तीस घोटाळ्यात नाव

0

ठाकरे गटाचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण गेल्यावर्षे राज्यभरात गाजेलेल्या तीस-तीस घोटाळ्यात दानवे यांचे नाव समोर येत आहे. विशेष म्हणजे या घोटाळ्याची ‘ईडी’ने माहिती मागवली आहे. या घोटाळ्यातील मुख्य आरोपी संतोष राठोडकडे पोलिसांना तीन डायऱ्या मिळाल्या होत्या. ज्यात अंबादास दानवे यांचे देखील नाव असल्याची माहिती समोर आहे. त्यामुळे दानवे यांची अडचण वाढण्याची शक्यता आहे.

राज्यात गाजलेल्या तीस-तीस घोटाळ्याची माहिती ईडीने मागवली आहे. त्यामुळे या प्रकरणाची ईडीकडून चौकशी केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे याच घोटाळ्यात अंबादास दानवे यांचे नावाची चर्चा समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या घोटाळ्याशी संबंधित तीन डायऱ्या पोलिसांना मुख्य आरोपी संतोष राठोडकडे सापडल्या होत्या. ज्यात पैसे गुंतवणूक करणाऱ्या लोकांची नावे होते. तर याच नावांच्या यादीत अंबादास दानवे यांचे देखील नाव असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

तसेच या प्रकरणाची जर या घोटाळ्याची ईडीने चौकशी केली तर, दानवे यांची अडचण वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आता ठाकरे गटाचा आणखी एक नेता ईडीच्या रडारवर असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे. मात्र दुसरीकडे त्या डायरीत माझं नाव नाही,कोणी दुसरा दानवे असेल.’ असा खुलास दानवे यांनी केला आहे. यावर अद्याप उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिली नसून डायरीत असलेले दानवे हे अंबादास दानवे आहेत की आणखी दुसरे हे लवकरच समोर येईल

Leave A Reply

Your email address will not be published.