कोरोना महामारीने निर्माण झालेल्या परिस्थिती मुळे प्रकाशन व व्यक्तीचित्र प्रदर्शन पुढे जात असलेल्या माझ्या *ज्यांनी आभाळ कवेत घेतलं..* या पुस्तकातील अनेक दिग्गजांपैकी.. * *मान्यवर मानकरी*
*@@- विनोद तावडे:-@@*
…….,……………………………………
*”वाद आणि संकटे अंगाखांद्यावर खेळवत तयार झालेला “संघ मुशी”तील लढवय्या नेता !
१९७० दशकानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघात पूर्णवेळ कार्यकर्त्यांच्या ज्या पिढ्या घडल्या त्यांतील एक आक्रमक बिनीचा आक्रमक शिलेदार.. . *अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थी चळवळीतून नावारुपास आलेला नेता विनोद तावडे!..माणसे जोडण्याचा उपजत स्वभाव आणि संघटन कौशल्याच्या बळावर पाहता पाहता महाराष्ट्रातील भाजप कार्यकर्त्यांचा विनोद भाऊ बनला! राजकारणातील वाद आणि संकटे अंगाखांद्यावर खेळविण्याची आपली शैली जतन करत वाटचाल करणाऱे विनोदभाऊ भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या पंक्तीत लिलया जावून बसले!राज्यात सर्वच क्षेत्रात विणलेले मित्र आणि कार्यकर्त्यांचे जाळे तसेच अभ्यासू आक्रमक वक्तृत्त्वशैलीमुळे त्यांचा राजकारणात आणि पक्षात दबदबा निर्माण झाला.मुंबई अध्यक्षपदापासून विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदे त्यांच्याकडे चालत आली.२०१४ साली भाजप-शिवसेना युती सत्तेवर येण्यात त्यांचे ठळक योगदान राहिले. ते शिक्षणमंत्रीही झाले.२०१९ घ्या विधानसभा निवडणुकीवेळी मात्र वाद आणि संकटे अंगावर घेण्याचा स्वभाव त्यांच्या अंगाशी आला आणि भाजपने त्यांना उमेदवारीही दिली नाही.आज ते भाजपचे राष्ट्रीय सचिन आहेत.गेली वीस वर्षे राज्यातील आपले मित्र आणि स्नेहीजनांना पुस्तकें देवून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याची एक चांगली परंपरा त्यांनी निर्माण केली आहे.अशा या अभ्यासू, आक्रमक आणि दिलदार मित्राचा आज वाढदिवस आहे..विनोदभाऊंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!..*.
-राजा माने.
@@@@@@@@@@@@
*”ज्यांनी आभाळ कवेत घेतलं..”*
लेखक: *राजा माने*
———————————-
प्रकाशक: *दत्ता थोरे, संतोष पवार*
(प्रगती प्रकाशन)
चित्रकार: *नितीन खिलारे*
मुखपृष्ठ: *सचिन खरात*
………………………………….