Latest Marathi News

BREAKING NEWS

वेस्‍पा कंपनीचे ४ नवीन रंगांमधील आकर्षक व्‍हेरिएण्‍ट्स बाजारात दाखल, जाणून घ्या किंमत

0

पियाजिओ वेईकल्‍स प्रा. लि. या इटालियन पियाजिओ ग्रुपची वेस्पा ही स्कुटर हिंदुस्थानात तरुणांच्या मोठ्या प्रमाणात पसंतीस उतरली. या स्कुटरची आकर्षक डिझाईन, रंग, इंजिन आणि बिल्ड क्वालिटी यामुळे या स्कुटरच्या विक्रीला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. पियाजिओ कंपनीने वेस्‍पा चार नवीन आकर्षक रंगांमध्ये लाँच केली आहे. मिडनाइट डिसर्ट, तुस्‍कानी सनसेट, जेड स्ट्रिक व सन्‍नी एस्‍केपेड हे वेस्पाचे नवीन रंग बाजारात दाखल झाले आहेत.

मिडनाइट डिसर्ट, तुस्‍कानी सनसेट व सन्‍नी एस्‍केपेड या नवीन रंगांमधील लिमिटेड एडिशन वेस्‍पा एसएक्‍सएल स्‍पोर्ट लॉंच करण्‍यात आली आहे. वेस्‍पा एसएक्‍सएल रेसिंग 60एस ही सध्याच्या सफेद रंगाव्‍यतिरिक्‍त जेड स्ट्रिक या नवीन रंगामध्‍ये लॉंच करण्यात आली आहे. वेस्‍पा एसएक्‍सएल मॉडेल्‍स आता मिडनाइट डिसर्ट व तुस्‍कानी सनसेट या दोन नव्या रंगांमध्‍ये उपलब्‍ध असतील.

याबद्दल पियाजिओ वेईकल्‍स प्रा. लि.चे अध्‍यक्ष व व्‍यवस्‍थापकीय संचालक डिएगो ग्राफी म्‍हणाले की, ”आम्‍हाला हिंदुस्थानी ग्राहकांकडून उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाल्‍यानंतर नवीन स्‍टाइलची आकर्षक वेस्‍पा लॉंच करण्‍याचा आनंद होत आहे. वेस्‍पा ही फक्‍त स्‍कूटर नसून इटालियन जीवनशैली व वारसाची आयकॉन आहे. वेस्पाला हिंदुस्थानात खूप प्रेम मिळाले आहे.

ग्राहकांना त्‍यांच्‍यासाठी सर्वोत्तम व्‍हेरिएण्‍टची निवड करण्‍याकरिता वेस्‍पाच्‍या नवीन कलर पोर्टफोलिओ लॉंच करण्यात येत आहे. वेस्पाचे नवीन व्‍हेरिएण्‍ट्स हिंदुस्थानींच्या व्‍यक्तिमत्त्वाशी संलग्‍न होत त्‍यांना अद्वितीय रायडिंगचा अनुभव देतील. ही आम्हाला खात्री आहे. वेस्‍पाचे नवीन रंगांमधील एसएक्‍सएल व्‍हेरिएण्‍ट्स हिंदुस्थानात सर्व डिलर्सकडे 1 डिसेंबर 2022 पासून उपलब्‍ध झाले आहेत

Leave A Reply

Your email address will not be published.