Latest Marathi News

BREAKING NEWS

‘वेडात मराठे वीर…’मध्ये सिद्धार्थ जाधवची एंट्री? सोशल मीडियावर त्या फोटोमुळे चर्चा

0

वेडात मराठे वीर दौडले सात’. महेश मांजरेकर यांचा महत्वपूर्ण प्रोजेक्ट असलेल्या या सिनेमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सात शूरवीर मावळ्यांची कथा उलगडणार आहे.महेश मांजरेकर स्वत: सिनेमाचे दिग्दर्शन करत आहेत. चित्रपटाच्या सेटवरील काही ना काही किस्से ऐकू येत असतानाच आता अभिनेता सिद्धार्थ जाधवचीही यामध्ये भूमिका असणार का या चर्चेला उधाण आले आहे. पण ही चर्चा नेमकी आली कुठून?

तर अभिनेता सिद्धार्थने नुकताच सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये सर्व सिद्धार्थसोबत इतर अभिनेते दिसत आहेत. जिममध्ये वर्कआऊट करताना दिसत आहेत. सिद्धार्थसोबत दिसत असलेले सर्वच कलाकार ‘वेडात मराठे…’ मध्ये भूमिका साकारणार आहेत. यामध्ये अभिनेते प्रविण तरडे, जय दुधाणे, हार्दिक जोशी, उत्कर्ष शिंदे, विशाल निकम, विराट मडके यांची भूमिका असणार आहे. आता या कलाकारांसोबत सिद्धार्थ काय करतोय असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

या फोटोवरुनच आता सिद्धूने देखील सिनेमात एंट्री घेतली की काय अशी चर्चा जोर धरु लागली आहे. सिद्धार्थने जिममधला हा फोटो शेअर करत हटके पद्धतीने गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘गुढीपाडवा आणि नववर्षाच्या शुभेच्छा, आडवा होईपर्यंत व्यायाम करुन साजरा केला पाडवा.’ असं भन्नाट कॅप्शन सिद्धूने पोस्टखाली लिहिले आहे. महेश मांजरेकर यांच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ सिनेमाच्या चित्रीकरण जोरात सुरु आहे. भूमिकेच्या तयारीसाठी सर्वच कलाकार सध्या जिममध्ये वर्कआऊट करताना दिसतात. सध्या या चित्रपटाची कोल्हापुरातील पन्हाळा गडावर शूटिंग सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.