Latest Marathi News

BREAKING NEWS

मानवी हक्कसाठी लढणाऱ्या संस्थेच्या बार्शी तालुका अध्यक्षपदी आकाश दळवी

0

बार्शी |

मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संघटना ही मानवी हक्कांविषयी जनजागृति करणारी सामाजिक संघटना आहे. ही संघटना अन्याय, अत्याचार, पीडित, शोषित आणि गरीब वंचित घटकांच्या न्याय आणि हक्कासाठी शासन, प्रशासन दरबारी पत्रव्यवहार करून तसेच उच्च व सर्वोच्च न्यायालय व आयोग यांच्याकडून न्यायासाठी जनहित याचिका दाखल करून लढत असणारी संघटना आहे.

या संघटनेचे बार्शी तालुका अध्यक्ष म्हणुन खांडवीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आकाश दळवी यांची संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष विकास कुचेकर आणि महाराष्ट्राचे सचिव मनिष देशपांडे यांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आली व नियुक्ती पत्र देण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.