Latest Marathi News

BREAKING NEWS

 वैफल्यग्रस्त झाल्यामुळे संजय राऊत अशी विधानं करत आहेत- श्रीकांत शिंदे 

0

 

 

शिसवेना नेते एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासोबत ३५८ आमदारांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे अशातच आता आरोप-प्रत्यारोप, गौप्यस्फोट यांच्या मालिकेनंतर आता सतत स्थापनेचा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. तर याप्रकरणावर संजय राऊतांनी थेट बंडखोर आमदारांवर निशाणा साधला आहे गुवाहाटीला जगेल्या आमदाराचे शवच फक्त राज्यात पुन्हा येतील असे वादग्रस्त विधा राऊत यांनी केले होते आता या विधानावर खासदार श्रीकांत शिंदे यांनी भाष्य केले आहे.

 

शिंदे म्हणाले की, “ही बंडखोरी नाही. महाराष्ट्राच्या जनतेला जे अपेक्षित आहे, ते एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली करण्याचा आमचा प्रयत्न आहे. जे घडतंय ते महाराष्ट्राची आणि हिंदुस्तानची जनता बघतेय.ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. त्यांनी पोकळ धमक्या दुसऱ्यांना जाऊन दिल्या पाहिजेत. वैफल्यग्रस्त झाल्यामुळे ते अशी वक्तव्ये करत आहेत,” अशी प्रतिक्रिया श्रीकांत शिंदे यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्यावर दिली आहे.

 

रविवारी सकाळी शिवसेनेच्या मेळाव्यात बोलताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची जीभ घसरली. गुवाहाटीहून 40 आमदारांचे मृतदेह मुंबईत येतील आणि त्यांचं शवविच्छेदन होईल, असं विधान राऊत यांनी केलं. त्यावरून मोठा वाद सुरू झाला. या विधानानंतर सर्वच राजकीय पक्षांनी आणि समजाकी संघटनानी राऊत यांच्या या विधानाचा निषेध केला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.