Latest Marathi News

BREAKING NEWS

शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्या राजेंद्र पाटील यड्रावकरांच्या कार्यालयाच्या दिशेने धडकला शिवसैनिकांचा मोर्चा  

0

 

 

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या डजनभर आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरोधात बंड पुकारले आहे तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या आमदारांनी केलेल्या बंडाला ठाकरेंसह संजय राऊतांकडून जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. संजय राऊत अनेकदा आक्रमक भाषा वापरत आहेत. तर दुसरीकडे कोल्हापुरात सुद्धा बंडखोरांविरोधात वातावरण तापले आहे.

 

कोल्हापूर जिल्ह्यातून एकमेव शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार आणि राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि अपक्ष आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी शिंदे गटाला समर्थन देत बंडखोरी केल्याने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कट्टर शिवसैनिक विरुद्ध बंडखोर समर्थक अशा राजकीय संघर्षाला सुरुवात झाली असून राजकीय वातावरण टपले आहे.

 

आज जयसिंगपूरमध्ये राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचे समर्थक त्यांच्या कार्यालयासमोर एकवटल्यानंतर आता शिवसैनिकही मोर्चा येऊन धडकले आहेत. यावेळी पोलिसांनी मोर्चा अडवल्यानंतर शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. तुम्हाला मंत्रिपद देऊनही तुम्ही बंडखोरी का केली ? अशी विचारणा शिवसैनिकांनी राजेंद्र पाटील यड्रावकरांना करत आहेत. शिवसैनिकांनी यावेळी यड्रावकरांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

 

त्यामुळे जयसिंगपूर मध्ये आजा राजकीय आखाडा निर्माण झाला आहे. दोन्ही बाजूंकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. पोलिसांकडूनही कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मात्र, बंदोबस्त भेदून शिवसैनिकांनी राजेंद्र पाटील यड्रावकरांच्या कार्यालयाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला. ज्या ठिकाणी शिवसैनिक आणि पोलिस आमनेसामने आले आहेत त्या ठिकाणापासून यड्रावकरांचे कार्यालय हाकेच्या अंतरावर आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.