Latest Marathi News

BREAKING NEWS

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात जोरदार स्वागत

0

 

नागपूर | भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्याचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात दाखल झाले आहेत. त्यांच्या आगमनानंतर नागपुरात जल्लोष दिसून येत आहे. यावेळी त्यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. उत्साह असला जबाबदारीची जाणीव, असे फडणवीस यांनी माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली आहे.

फडणवीस म्हणाले की, राज्यात जोरदार पाऊस पडत आहे. कोकणात मुसळधा पाऊस कोसळत आहे. तेथे पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पूरस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. परिस्थिती हातळण्यासाठी आदेश दिलेले आहेत. मी आढावा घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आढावा घेतला आहे. त्यांनीही आदेश दिले आहेत.

उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर आज प्रथमच देवेंद्र फडणवीस प्रथमच नागपुरात आज दाखल झाले. नागपूर विमानतळावर देवेंद्र फडणवीसांचं स्वागत करण्यासाठी शेकडो नागपूरकरांची गर्दी झाली होती. देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी नागपूर विमानतळावर ढोल ताशे वाजविण्यात आले. भाजप कार्यकर्ते आणि नागरिकही विमानतळावर पोहचत मोठा जल्लोष केला.

यावेळी नागपूर विमानतळ ते धरमपेठ आणि फडणवीस निवासस्थानापर्यंत बाईक रॅली काढण्यात येणार आहे. तर लक्ष्मीभवन चौकात फडणवीस यांची जाहीर सभाही होणार आहे. नागपूरकर जनतेचे अभिवादन स्वीकारण्याकरता फडणवीसांसाठी खास रथ तयार करण्यात आला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.