Latest Marathi News

BREAKING NEWS

‘कॉमन मॅन आणि पोलीस’ या स्मृती चिन्हाचे चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत अनावरण

0

पुणे |

प्रसिद्ध व्यंगचित्रकार स्व. आर.‌के.‌लक्ष्मण यांच्या कुंचल्यातून साकारलेल्या ‘कॉमन मॅन आणि पोलीस’ या व्यंगचित्राला पुणे ग्रामीण पोलिसांनी आपले स्मृतिचिन्ह म्हणून निश्चित केले असून, या स्मृतीचिन्हाचे अनावरण आज ग्रामीण पोलीस मुख्यालय येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात केले. या कार्यक्रमाला पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील उपस्थित होते. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख व उषा लक्ष्मण उपस्थित होते. कोविड कालावधीत मृत्यूमुखी पडलेल्या पोलीस पाटील यांच्या कुटुंबियांना सानुग्रह अनुदानाच्या रकमेचे वाटपही यावेळी केले.

प्रसिद्ध व्यंगचित्रकार स्वर्गीय आर के लक्ष्मण यांनी वेगवेगळे सामाजिक विषय घेऊन संपूर्ण हयात भर व्यंगचित्र साकारली होती, त्यांच्या व्यंगचित्राचा अनोखा सन्मान उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.