Latest Marathi News

BREAKING NEWS

“उद्धव ठाकरेंनी आता स्वतःच्या गटाचं नाव.”, निलेश राणे यांचा जोरदार टोला

0

 

मुंबई | : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशीच बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला आहे. शिवसेनेचे डझनभर नेत्यांनी शिंदे गटात शामिल होण्याचा निर्णय घेतला आहे. याचा मोठा फटका शिसेनेला तसेच महाविकास आघाडी सरकारला बसला आहे. यावरूनच भाजप नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खोचक टोला लगावला आहे.

“एकनाथजी शिंदें सोबत इतके आमदार निघून गेले आहेत की उद्धव ठाकरेंनी आता स्वतःच्या गटाचं नाव “शिवसेना” ऐवजी “शिल्लक सेना” करून घ्यावं.”, असा खोचक सल्ला निलेश राणे यी ट्वीट करत दिला आहे. यापूर्वी सुद्धा अनेक मुद्द्यावरून निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघडीवर घणाघाती निशाणा साधला होता.

दरम्यान या सर्व बंडामागील खुलासा एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत केला आहे. “मुंबई बाँबस्फोट घडवून निष्पाप मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या दाऊदशी थेट संबंध असणाऱ्यांना हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना समर्थन कशी करू शकते? यालाच विरोध म्हणून उचललेलं हे पाऊल; आम्हा सर्वांना मृत्यूच्या दारात घेऊन गेले तरी बेहत्तर.”, असे ट्वीट एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.