Latest Marathi News

BREAKING NEWS

उद्धव ठाकरे गट सोडण्याचा नेमकं कारण आलं समोर, मनीषा कायंदे म्हणाल्या की,

0

शिसवेना गटाच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी काळ उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला तत्पूर्वी उद्धव ठाकरे गटाकडून त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती. मनीषा कायंदे यांनी आज पत्रकार परिषद घेत ठाकरेंची साथ सोडण्याचं कारण सांगितलं. ‘अधिकृत शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. त्यामुळे मी शिवसेनेतच आहे, अशी प्रतिक्रिया मनीषा कायंदे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

शिंदे गटात नव्याने प्रवेश केलेल्या मनीषा कायंदे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी मनीषा कायंदे यांनी ठाकरे गटातील नेत्यांवर गंभीर आरोप केले. मनीषा कायंदे म्हणाल्या, ‘गेली १० वर्ष मी उद्धव ठाकरे यांच्यासोबत काम केलं. आता मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे. अधिकृत शिवसेना ही शिंदे यांच्याकडे आहे. त्यामुळे मी शिवसेनेतच आहे. मी पहिल्यांदा मतदान शिवसेनेला केलं. मी भाजपात होते, तरी काम सेनेसाठी केलं’.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, ‘संघटनात्मक काम करण्याचा माझा पिंड आहे. पक्षाने मला मान-सन्मान दिली. मी पक्षाची भूमिका मांडली. आता पक्षाची भूमिका, विचारधारा भरकटत आहे. माझी अजून १ वर्ष टर्म आहे. संघटनेत चांगलं पद द्या. एवढीच मागणी केली. मला औरंगाबादमध्ये जबाबदारी दिली आणि त्यानंतर एका ज्युनियरला डोक्यावर बसवलं, अशी खंत कायंदे यांनी व्यक्त केली.

Leave A Reply

Your email address will not be published.