पितृपंधरवाड्यामुळे अनेक मंत्र्यांनी पदभार स्वीकारला नसल्याची सध्या चर्चा आहे, यावर बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी सत्ताधाऱ्यांवर विरोधकांवर सडकून टीका केली आहे.“याचे मला फारसे ज्ञान नाही, परंतु माझ्या माहितीप्रमाणे सरकार येऊन अडीच महिने झाले आहेत, ज्यांना कामच करायचे नाही.. रुसवे फुगवे आहेत. त्यांनी 50 खोके घेतले आहेत. त्यामुळे काम करायची गरज वाटत नाही. हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, असा टोला सुळेंनी लगावला..
बारामती किंवा पुणे जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्राच्या विरोधात सातत्याने एक षडयंत्र होत असल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामतीत केला. राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री आपली खुर्ची वाचविण्यासाठी राज्य पणाला लावत आहे. असेही सुळे यावेळी म्हणाल्या.
पुढे बोलताना सुळे म्हणाले की, सरकारी येऊन अडीच महिने झाले तरी.अनेक मंत्री अजून त्यांच्या कार्यालयातही गेले नाहीत. पालकमंत्र्यांची नेमणूक केली नाही.डीपी डीसीचे हक्काचे पैसेही खर्च होतनाहीत.त्यामुळे महाराष्ट्रातील विकास कामे ठप्प आहेत. महाराष्ट्राला गुजरातपेक्षा पुढे नेऊ असे उदगार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी एका कार्यक्रमादरम्यान बोलताना काढले. यावर अधिक भाष्य न करता आम्ही त्याची वाट बघतोय अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.