अभिनेत्री राखी सावंत सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी आदिल खान याच्यावर असलेलं प्रेम व्यक्त करणारी राखी हिने पतीवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच अधिक खावेत एक रशियन महिलेने बलात्काराचा आरोप सुद्धा लगावला होता. या प्रकरणात त्यांच्यावर कारवाई शुद्ध करण्यात आली होती तर रिपाई तर्फे राखी सावंत हिच्यासाठी आंदोलन सुद्धा छेडण्यात आले होते.
आदिल प्रकरणी राखी सतत पोलीस आणि न्यायालयात धाव घेत आहे. पती आदिल खान याला जामिन न मिळावा म्हणून राखी पूर्ण प्रयत्न करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी राखीने आदिलवर गंभीर आरोप केले होते, त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. आदिलला सध्या पोलीस कोठडीत ठेवण्यात आलं आहे. २० फेब्रुवारी २०२३ रोजी राखी आदलला भेटायला गेली होती, तेव्हा आदिलने आपल्याला धमकी दिल्याचं राखीने सांगितलं आहे.
सोमवारी आदिल प्रकरणी सुनावणी झाली. त्यानंतर राखीने माध्यमांसोबत संवाद साधला. राखी म्हणाली, ‘आदिल मला म्हणाला यापेक्षा वाईट आणखी काय असू शकतं. मी आर्थर रोड तुरुंगात गेलो. याठिकाणी मला भांडी घासावी लागत आहेत. लोकांचे पाय दाबावे लागत आहेत. आर्थर रोड तुरुंगात प्रचंड मारतात. यापेक्षा माझ्यासोबत आणखी वाईट काय असू शकतं. मी बाहेर आल्यानंतर, तुझं काय होईल…’