Latest Marathi News

BREAKING NEWS

तुम्हाला पाकिस्तानचे सर्टिफिकेट लागते हेच मोठे दुर्दैव; मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला

0

जळगाव येथे पार पडलेल्या सभेमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट शिंदे-फडांवस सरकारवर निशाणा साधला होता आता या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिउत्तर दिले आहे, इथे जमलेली गर्दी बघून खरी शिवसेना कुणाची? हे दिसून येत आहे. पाकिस्तानला विचारले की शिवसेना कुणाची तर पाकिस्तानही सांगेल. पण आमच्याकडे मोतीबिंदू झालेल्या निवडणूक आयुक्ताला कळत नाही. असे म्हणत उद्धव ठाकरेंनी काल जळगाव येथील पाचोऱ्यातल्या सभेत टीका केली होती. ठीक आहे तो त्यांचा दोष आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले होते.

यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. कुणीतरी म्हणाले की खरी शिवसेना काय आहे? हे पाकिस्तानला विचारले तर तेहीही सांगतील. खरे तर हे महाराष्ट्राचे आणि देशाचे दुर्दैव आहे. कारण तुम्हाला तुमची शिवसेना खरी की खोटी हे सांगायला पाकिस्तानचं सर्टिफिकेट घ्यावे लागते. यापेक्षा आणखी काय दुर्दैव असू शकते? असा प्रश्न विचारत एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे.

पाचोरा या ठिकाणी उद्धव ठाकरेंची सभा काल पार पडली. या सभेत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील यांच्यासह भारतीय जनता पक्षाला लक्ष्य केले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका केली. या सभेवरून आता शिवसेना आणि भाजपकडून प्रत्युत्तरं दिले जात आहेत. आता या टीकेला उद्धव ठाकरे गटाकडून काय प्रतिउत्तर देण्यात येते हे पाहावे लागणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.