जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरीवंद केजरीवाल यांच्यात शाब्दिक चकमक आता आणखीच वाढतांना पाहायला मिळत आहे. भारतीय जनता पक्ष अण्णा हजारे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवत असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला होता. त्यांच्या याच आरोपाला आता अण्णा यांनी उत्तर दिले आहे. भाजपच्या अनेक नेत्यांना मी घरी बसवलं असल्याचे अण्णा म्हणाले. अण्णा हजारे औरंगाबाद दौऱ्यावर असून, यावेळी माध्यमांशी बोलतांना त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अण्णा हजारे यांनी दिल्लीच्या लिकर धोरणावरून मुख्यमंत्री केजरीवाल यांना खरमरीत पत्र लिहिले होते. त्यावर प्रतिक्रिया देतांना, भाजप अण्णा हजारे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवत असल्याचं केजरीवाल म्हणाले होते. अण्णा यांना भाजप बोलायला लावत असल्याचा आरोपही केजरीवाल यांनी केला होता. त्यांच्या याच आरोपाला अण्णांनी उत्तर दिले आहे.
तुम्हाला भाजप बोलायला लावत आहे या आरोपावर बोलतांना अण्णा म्हणाले की, त्यांना काय बोलायचं बोलु द्या, मात्र मी सुद्धा भाजपच्या अनेक नेत्यांना घरी बसवलं आहे याचीही आठवण त्यांनी ठेवावी. यापेक्षा जास्त काय बोलू असा टोला अण्णांनी केजरीवाल यांना लगावला आहे. तर यावर आणखी बोलण्यास त्यांनी नकार दिला. त्यामुळे येत्या काळात अण्णा अहजरे आणि अरविंद केजरीवाल यांच्यातील शब्दहीक चकमक अधिक वाढणार असल्याचे चित्र आता दिसून येणार आहे.