यांच्यासोबत राष्ट्रवादीचे अनेक आमदार आणि प्रमुख नेते आहेत, त्यामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे. तर दुसरीकडे अजित पवारांच्या या बंडानंतर राज्यभरातून प्रतिक्रिया उमटताना दिसून येत आहेत अशातच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर पुन्हा एकदा शरद पवार मैदानात उतरले आहेत. पवार आज नियोजित दौऱ्याप्रमाणे कराड येथे आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले.
शरद पवार लवकरच राज्यव्यापी दौरा करणार आहे. कराडमध्ये पत्रकार परिषद घेत पक्षाची पुढील भूमिका स्पष्ट केली. या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर पवारांनी खडसावले. शरद पवारांनी पत्रकाराला खडसावलं पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने शरद पवार यांना अजित पवार यांचं बंड म्हणायचं का आशीर्वाद?
असा प्रश्न विचारला होता. यावर पवार म्हणाले, की आम्ही कुणाच्यावर अपात्रतेच्या कारवाईमध्ये जाणार नाही. या सगळ्या रस्त्यात आम्ही कुठे जाणार नाही. तुमच्या सारखं माफ करा.
पण क्षुद्र बुद्धीच्या व्यक्ती असेल तोच आशीर्वाद देईल, त्याला एवढं समजत नाही. मी जाहिरपणाने महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघालोय, पक्षाच्या बांधणीसाठी. त्यावेळेला पत्रकार परिषदेत आशीर्वाद शब्द वापरून एकंदर पत्रकारितेचा दर्जा खराब करू नका, ही माझी विनंती आहे, अशा शब्दात पवारांनी पत्रकाराला खडसावलं आहे. शरद पवार लवकरच राज्यव्यापी दौरा करणार दरम्यान, पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार लवकरच राज्यव्यापी दौरा करणार आहेत.