Latest Marathi News

BREAKING NEWS

शरद पवारांचा हा नेता असेल स्टार प्रचारक ; आगामी निवडणुकांसाठी केली निवड

0

मुंबई |

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या मान्यतेने आगामी निवडणुकांकरिता खा. डॉ. अमोल कोल्हे यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रचार प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते खा. डॉ. अमोल कोल्हे यांना सदर नियुक्तीचे पत्र सुपूर्द करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने याविषयीची माहिती सोशल मीडियाद्वारे दिली आहे. पक्षाने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या मान्यतेने आगामी निवडणुकांसाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रचार प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते अमोल कोल्हे यांना नियुक्तीचे पत्र सुपूर्द करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय कार्याध्यक्ष व महाराष्ट्र प्रभारी खा. सुप्रिया सुळे, कोषाध्यक्ष माजी आमदार हेमंत टकले, पालघर जिल्हा अध्यक्ष आमदार सुनील भुसारा, प्रदेश सरचिटणीस अदिती नलावडे, प्रदेश सरचिटणीस संदीप बेडसे, मुंबई कार्याध्यक्ष राखी जाधव, युवक प्रदेश अध्यक्ष महेबूब शेख, विद्यार्थी प्रदेश अध्यक्ष सुनील गव्हाणे, युवक प्रदेश उपाध्यक्ष अमोल मातेले उपस्थित होते.

पक्षाने मोठी जबाबदारी दिल्यानंतर खासदार अमोल कोल्हे यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे आभार मानले आहेत. कोल्हे यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटलंय की, आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचारप्रमुखपदी माझी नियुक्ती करण्यात आली. माझ्यावर हा विश्वास दाखवत ही जबाबदारी दिल्याबद्दल शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मी आभार मानतो! तुम्ही सर्वांनी दाखवलेला हा विश्वास मी नक्कीच सार्थ ठरवेन!

Leave A Reply

Your email address will not be published.