Latest Marathi News

BREAKING NEWS

“फडणवीसांना हे असे गुरुजी लाभल्यानेच…”, ठाकरे गटाचा संभाजी भिडे व  फडणवीसांवर हल्लाबोल

0

सध्या काही लोक मिशी व दाढीवर बोटे फिरवत उसने अवसान आणत आहेत. आत्याबाईंच्या मिश्यांप्रमाणे त्यांची अवस्था आहे, पण झुरळांनाही मिश्या असतात व अनेकदा फवारणी करून ढेकूण व झुरळे मारावी लागतात. शिवरायांच्या महाराष्ट्रात आगी लावण्याचे कंत्राट कोणी घेतले असेल तर जनतेने सावध राहायला हवे. फडणवीसांना गुरुजी असतील, पण महाराष्ट्राची अकरा कोटी जनता हेडमास्तर आहे, असा हल्लाबोल शिवसेनेने ( ठाकरे गट ) ‘सामना’ अग्रलेखातून केला आहे.

हेही वाचा :विधानसभेत सेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमधील कुजबुजीमुळे बच्चू कडू संतापले; म्हणाले, “जुगाराच्या अड्ड्यावर…”

हेही वाचा :एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, “महाराष्ट्राचा महागद्दार कोण आहे हे…”

“मणिपूर, हरियाणाच्या वाटेने महाराष्ट्र जाणार नाही. फडणवीसांना हे असे गुरुजी लाभल्यानेच महाराष्ट्र शिवरायांच्या, फुले, आंबेडकर, शाहूंच्या मार्गापासून भरकटताना दिसत आहे. पण, महाराष्ट्र हे शहाण्यांचे व शूरांचे राज्य आहे. शाईस्तेखानाची बोटे छाटणारा महाराष्ट्र झुरळांच्या मिश्यांची पर्वा कशाला करेल?” अशी अप्रत्यक्षपणे टीका ठाकरे गटाने संभाजी भिडे यांच्यावर केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.