Latest Marathi News

BREAKING NEWS

कात्रज कोंढवा स्त्याच्या कामाला गती मिळणार, पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी केले वाहतूक पोलीस आणि महावितरणचे अभिनंदन..!

0

पुणे : कात्रज कोंढवा रस्त्याच्या कामाला गती मिळावी; यासाठी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी प्रत्यक्ष भेट देऊन रस्त्याच्या कामात येणाऱ्या अडचणी समजून घेतल्या होत्या. यात प्रामुख्याने वाहतूक नियंत्रणासाठी अतिरिक्त पोलीस कर्मचाऱ्यांच्या आवश्यकतेसह रस्त्याच्या आराखड्यातील महावितरणचे खांब, विद्युत तारा आणि डीपी आदींमुळे येणाऱ्या अडचणी अधिकाऱ्यांनी पाटील यांच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या.

सदर समस्या दूर करण्यासाठी आज पाटील यांनी वाहतूक नियंत्रणासाठी ५० पोलीस कर्मचारी, रस्त्याच्या आराखड्यात येणारे महावितरणचे खांब आणि विद्युत तारा तातडीने स्थलांतरित करण्यासाठी महापालिकेकडून स्वतंत्र अभियंता देण्याच्या सूचना वाहतूक पोलीस उपायुक्त आणि महावितरणच्या मुख्य अभियंत्यांना दिल्या.

यानुसार, महावितरणकडून तात्काळ कार्यकारी अभियंता रविंद्र आव्हाड यांना स्वतंत्र अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली असल्याची त्याचबरोबर वाहतूक नियंत्रणासाठी पोलिस विभागाद्वारे ५० वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती पाटील यांनी दिली. यामुळे आता रस्त्याच्या कामाला गती मिळणार असून मी वाहतूक पोलीस आणि महावितरणच्या कार्यतत्परतेबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन करतो असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.