पुणे : आज कोथरूडचे आमदार आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मतदारसंघातील पाषाण येथील कैवल्य महिला भजनी मंडळास पेटी आणि वीणा भेट दिली. भविष्यातही महिलांना स्वावलंबी होण्यासाठी सर्वोतोपरी मदत करण्याची ग्वाही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दिली.
पाटील म्हणाले भजन म्हणजे नादब्रह्माशी एकरुपत्व, सप्तसुरांची आळवणी, परमेश्वराच्या दिव्यशक्तीचे गुणगान, चिंतन आणि एकाग्रता! परमेश्वराच्या दिव्यशक्तीच्या चिंतनात अबाल वृद्ध, महिलावर्ग नेहमीच तल्लीन होत असतो. या चिंतनात आपलाही सहभाग असावा, यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील असतो. कैवल्य महिला भजनी मंडळास पेटी आणि वीणा देऊन सेवा करण्याचे भाग्य लाभले. यासाठीच कोथरुडमधील अनेक भजनी मंडळांना मदत देखील केली आहे.
यावेळी पुण्यातील भाजपा नेते गिरीश खत्री, रोहन कोकाटे, धनंजय रसाळ, पार्थ मटकरी उपस्थित होते.