Latest Marathi News

BREAKING NEWS

कोथरुड मंडलाचे नवे कार्यालय हे संघटनवाढीसह जनसेवेचे केंद्र व्हावे – चंद्रकांत पाटील

0

पुणे : घटस्थापनेच्या मुहूर्तावर रविवारी भारतीय जनता पक्षाच्या कोथरूड मंडलाचे अद्ययावत तंत्रज्ञानाने युक्त कार्यालय सुरू करण्यात आले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या.

चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, घटस्थापनेच्या मुहूर्तावर या कार्यालयात सत्यनारायण पुजेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित राहून तीर्थप्रसादाचा लाभ घेतला. भारतीय जनता पक्ष हा सर्व सामान्यांचा पक्ष आहे. त्यामुळे पक्षाचे प्रत्येक कार्यालय हे जनसेवेचे केंद्र आहे. कोथरुड मंडलाचे नवे कार्यालय हे संघटनवाढीसह जनसेवेचे केंद्र व्हावे, अशी अपेक्षा पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी कोथरुड दक्षिण मंडल अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, उत्तर मंडल अध्यक्ष सचिन पाषाणकर, भाजपा पुणे शहर सरचिटणीस पुनित जोशी, दीपक पोटे यांच्या सह सर्व पदाधिकारी आणि नगरसेवक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.