Latest Marathi News

BREAKING NEWS

“पक्षाचं नाव माझ्यासोबत राहील, ते बदलण्याचं काम निवडणूक आयोगाचं नाही” – उद्धव ठाकरे

0

मुंबई |

शिवसेना नांवावर सांगितलं उद्धव ठाकरे यांनी हक्क, शिवसेना कोणत्याही पक्षाला देण्याचा निवडणूक आयोगाला अधीकार नाही, शिवसेना नावासाठी ठाकरे आग्रही. निकालानंतर ठाकरेचा निर्धार कायम केला आहे.
राजकीय भूकंपानंतर उद्धव ठाकरे यांनी राज्यात दौरा सुरू केला आहे. आज विदर्भातील दौऱ्यावर असताना उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी फोडाफोडीच्या राजकारणावर भाष्य केले. तसेच, शिवसेना हे पक्षाचं नाव माझ्यासोबत राहील, ते बदलण्याचे काम निवडणूक आयोगाचे नाही, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.

सध्या सगळेजण पाहत आहेत, राजकारणात पक्ष फोडणे ही गोष्ट नवी नव्हती. पण, आता लोक पक्ष चोरत आहेत. पण, शिवसेना हे पक्षाचे नाव माझ्यासोबत राहील. शिवसेना हे नाव माझ्या आजोबांनी दिले होते. ते नाव मी कोणाला घेऊ देणार नाही. नाव देणं हा निवडणूक आयोगाचा आधिकारच नाही. निवडणूक चिन्ह निवडणूक आयोग देऊ शकते, तो त्यांचा अधिकार आहे. पक्षाचे नाव माझंच आहे आणि ते माझ्याकडेच राहील.

निवडणुकांदरम्यान नियमांचे पालन होत आहे की नाही, ते पाहणे त्यांचे काम आहे. पक्षाचे नाव बदलण्याचा त्यांना अधिकार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.