Latest Marathi News

BREAKING NEWS

…म्हणून साहेबांना पावसात भिजल्यावर सहानुभूती मिळते

0

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शरद पवारांची साथ सोडून पवारांच्या निष्ठावंतांना बरोबर घेऊन शिंदे फडणवीस सरकारमध्ये प्रवेश केला या पक्षप्रवेशनंतर शरद पवारांनी सर्व बंडखोरांच्या विरोधात शड्डू ठोकत थेट बंडखोरांच्या मतदार संघात जाहीर सभा घेण्याचा धडाकाच लावला अशातच भुजबळांच्या मतदार संघ असलेल्या येवल्याच्या जाहीर सभेत शरद पवारांचा पावसात भिजलेला फोटो समोर आला होत्या त्यामुळे पुन्हा एकदा साताऱ्याच्या सभेची पुनरावृत्ती होणार अशी चर्चा असताना राष्ट्रवादीचे बंडखोर नेते छगन भुजबळ यांनी पवारांना जोरदार टोला लगावला होता.

पावसात आम्हीही भिजतो. साहेबांचं वय झालं आहे, आजारपण आहे, त्यामुळे त्यांना सहानुभूती मिळते. आम्ही सुद्धा शिवसेनेत असताना पहाटेपर्यंत काम करायचो. मागच्या निवडणुकीत सुद्धा प्रचंड पावसात आम्ही बैठका घेतल्या. हा काही नवीन भाग नाही असं भुजबळ यांनी म्हटलं आहे. भुजबळ नाशिकहून पुण्याकडे निघाले होते, यावेळी त्यांचं संगमनेरमध्ये भव्य स्वागत करण्यात आलं. त्यावेळी भुजबळ बोलत होते.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या टीकेला देखील प्रत्युत्तर दिलं आहे.भारतीय जनता पक्षाला राष्ट्रवादी फोडल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. यावर बोलताना भाजपचं सुद्धा मुंडे कुटुंब या लोकांनी फोडलं होतं. धनंजय मुंडेंना तुम्हीच दूर केलं होतना असा खोचक टोला छगन भुजबळ यांनी लगावला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.