कोल्हापूर |
पालकमंत्री दीपक केसरकर यांनी लक्ष्मी विलास पॅलेस येथे छत्रपती राजश्री शाहू महाराजांची जयंती साजरी केली. छत्रपती राजश्री शाहू महाराजांचे विचार पुढे घेऊन जात होते. त्यांचे सामाजिक क्रांतीचे विचार तर होतेच मात्र सर्वांगीण विकासाची जे विचार होते. यामुळे त्यांनी सर्व समाजातील मुलांना शिक्षण भेटावे, यासाठी समाजातील मुलांसाठी वसतिगृहाची स्थापना केली शाळा सुरू केल्याने त्यांनी राधानगरी धरण उभे केले यामुळे शेतीमध्ये क्रांती निर्माण झाली. अनेक ठिकाणी त्यांनी बाजारपेठा बसवल्या आणि त्यांचा हा गौरव जगापर्यंत पोहोचवला गेला पाहिजे, असे म्हणत पालकमंत्री दीपक केसरकर म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा शाहू महाराजांनी जपला. छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचे वैभव व त्यांचे कार्य जगभरात पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले. राजर्षी शाहू मेमोरियल ट्रस्टच्या वतीने राजर्षी शाहू पुरस्कार वैद्यकीय क्षेत्रातील समाजसेवक डॉ.अभय बंग व डॉ.राणी बंग यांना शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. एक लाख रुपये, स्मृतिचिन्ह व मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
महात्मा गांधीजींच्या ‘खेड्याकडे चला’, या विचारांनी त्यांनी जीवनभर ग्रामीण भागासाठी मोलाचे कार्य केले आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा आपल्याला लाभला आहे. छत्रपती शाहू महाराजांनी अस्पृश्यता निवारण, महिलांसाठी शिक्षण, सामाजिक समता, शिक्षणासाठी सुविधा, शेतीच्या विकासासाठी पाण्याची सोय आदी महत्वपूर्ण कार्य केले. समाजाला चांगल्या पद्धतीने बदलण्याचा चमत्कार घडवून राजर्षी शाहू महाराजांचे विचार जोपासण्याचे काम डॉ.अभय बंग यांनी केले आहे. असे प्रतिपादन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री दीपक केसरकर तर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण, कार्यकारी अभियंता संजय पाटील, राजदीप सुर्वे आदी उपस्थित होते.