Latest Marathi News

BREAKING NEWS

स्वातंत्र्यदिनी भारतीयांना मिळणार कोरोना विरुद्ध ‘गिफ्ट’, स्वदेशी लस बाजारात येणार ?

0

कोरोनाने संपूर्ण जगभरात थैमान घातले असून एकूण रुग्णसंख्या 1 कोटींच्यावर पोहचली आहे. भारतामध्ये देखील covid-19 रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. यामध्ये आता भारतीयांना सुखावणारी बातमी आली आहे. संपूर्ण स्वदेशी निर्मिती कोरोना विरुद्धची लस 15 ऑगस्ट रोजी लाँच केले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान संस्था म्हणजे आयसीएमआर आणि भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड यांच्या प्रयत्नातून ही लस बनवण्यात येत आहे. सरकारकडून मानवांवरील प्रयोगासाठी भारत बायोटेक ला परवानगी देण्यात आली आहे. जुलै महिन्यामध्ये या टेस्ट केल्या जाणार आहेत.

सर्व क्लिनिकल ट्रायल्स यशस्वीपणे पार केल्यानंतर स्वातंत्र्य दिनी म्हणजेच 15 ऑगस्टला कोरोना विरुद्धची लस देशभरात उपलब्ध करून देण्याचा मानस आरोग्य मंत्रालयाकडून व्यक्त करण्यात आला आहे. सर्व सोपस्कार पारपडून ही लस covid-19 वर गुणकारी ठरल्यास भारतासाठी मोठी अभिमानाची गोष्ट असणार आहे

Leave A Reply

Your email address will not be published.