Latest Marathi News

BREAKING NEWS

केरळ विमान अपघातात प्राण गमावलेले सह-पायलट १५ दिवसानंतर वडील होणार होते. पण….

0

मुंबई : केरळ विमान अपघाताने सर्वांचेच हृदय हेलावून गेले होते. या विमानाचे पायलट दीपक वसंत साठे हे मराठी असल्याने अवघ्या महाराष्ट्राने दुहेरी शोक व्यक्त केला होता. अशातच वसंत साठे यांचे को-पायलट असणाऱ्या अखिलेश कुमार यांच्या विषयीच्या बातमीने सर्वानीच हळहळ व्यक्त केली आहे. उत्तर प्रदेशच्या माथुराचे रहिवासी असणारे अखिलेश कुमार यांची पत्नी मेधा गर्भवती आहे आणि अवघ्या 15 ते 17 दिवसात एक नवीन अतिथी त्यांच्याकडे येणार आहे. अशातच अखिलेश कुमार मरण पावल्याने अखिलेश यांचे गाव मोहनपूरमध्ये खळबळ उडाली आहे.

केरळमधील कोझिकोड विमान अपघातात प्राण गमावलेल्या सह पायलट अखिलेश कुमारची पत्नी गरोदर होती. पंधरा दिवसात त्यांच्या घरी पाळणा हलणार होता परंतु क्रूर नियतीने या कुटुंबाचे सर्व आनंद काढून घेतले. आता कुटुंबाकडे मुलाच्या फक्त आठवणी आहेत. अखिलेशची पत्नी दुःखाने बेशुद्ध अवस्थेत आहे.

शुक्रवारी दुबईच्या कॅलिकटवरून कोझिकोड विमानतळावर एअर इंडियाचे हे विमान उतरत होते, जोरदार पाऊस पडत होता. या पावसाच्या दरम्यान, 59 वर्षीय कॅप्टन दीपक वसंत साठे आणि त्याचा 33 वर्षीय सहकारी पायलट अखिलेश कुमार हे विमान उतरण्याचा प्रयत्न करीत होते. पावसामुळे लँडिंगला खूप त्रास झाला. शिवाय हा रनवे धोकादायक टॅबलटॉप रनवे मानले जातो. लँडिंगचे दोन प्रयत्न अयशस्वी झाले. तिसर्याा प्रयत्नादरम्यान विमान धावपट्टीवर घसरले आणि पुढे जात 35 फूट खोल दरीत कोसळले. क्षणार्धात विमानाचे दोन तुकडे झाले. पापणी लावण्याच्या आत विमानातील कित्येक लोक मृत्यमुखी पडले. यात दीपक वसंत साठे आणि को-पायलट अखिलेश कुमार यांचा देखील दुर्दैवी अंत झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.