Latest Marathi News

BREAKING NEWS

“शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष लवकरच निर्णय घेणार…!”

0

मुंबई |

महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ सुरु असतानाच शिवसेना शिंदे गटाच्या १६ आमदारांविरुद्धच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर लवकरच निर्णय घेणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह इतर आमदारांना नोटीस जाणार दिली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज त्यांना नोटीस देण्याची शक्यता आहे. निलंबित आमदार प्रकरणात पुढे कायदेशीर भूमिका काय याची विचारणा केली जाणार.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांना अपात्र ठरवण्यात यावं यासाठीची ठाकरे गटाची याचिका विधानसभा अध्यक्षांकडे दाखल आहे. त्यासाठी ठाकरे गटाकडून अनेकदा स्मरण पत्र ही देण्यात आलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावी असे निर्देश दिले आहेत. यामुळे आता राहुल नार्वेकर हे एकनाथ शिंदेंसह इतर आमदरांना नोटीस देऊन या कार्यवाहीची सुरुवात करणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर ९० दिवसांच्या विधानसभा अध्यक्षांना निर्णय घेण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.