Latest Marathi News

BREAKING NEWS

ठाकरे गटाचे आणखी 3 खासदार आणि 8 आमदार शिंदेंच्या संपर्कात, या नेत्याचा दावा

0

खासदार गजानन कीर्तिकर यांच्या सारखे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शिंदे गटात सामील झाले आहे. त्यानंतर आता ठाकरे गटाचे 3 खासदार आणि 8 आमदार शिंदे गटात येतील असा दावाच खासदार प्रतापराव जाधव यांनी केला आहे. बुलडाणा जिल्ह्याचे शिंदे गटात गेलेले खासदार प्रतापराव जाधव यांनी पुन्हा एक गौप्यस्फोट केला आहे. निवडणूक च्या तोंडावर 3 खासदार आणि 8 आमदार शिंदे गटात 100 टक्के येतील असा दावा केला आहे. गजानन कीर्तिकर यांच्यानंतर 3 खासदार शिंदे गटाच्या संपर्कात आहे.

आम्ही लोकांमध्ये राहणारे आहोत. आणखी काही लोक आमच्या संपर्कामध्ये आहे. पण काही स्थानिक अडचणी आहे, जिल्ह्यातील काही काम आहे. नेतृत्वावर प्रेम आहे म्हणून ते तिकडे थांबलेले आहे. जशा निवडणुकासमोर येतील शिवसेनेचे घर खाली झालेले असेल, असा दावा प्रतापराव जाधव यांनी केला आहे. याअगोदर देखील खासदार जाधव यांनी मुंबईचे एक खासदार शिंदे गटात येतील असा गौप्यस्फोट माध्यमांकडे केला होता.

त्या अनुषंगाने या खासदार गजानन कीर्तिकर शिंदे गटात सामील झाले होते. मात्र आता पुन्हा एकदा खासदार जाधव यांनी ठाकरे गटाचे 3 खासदार आणि 8 आमदार शिंदे गटात सामील होतील असा दावा केल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे.तर दुसरीकडे जळगाव जिल्ह्यातील धरणगावात शेकडो कार्यकर्त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत आज प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मोठ्या संख्येने तरुण कार्यकर्त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.