Latest Marathi News

BREAKING NEWS

…तेव्हा दंगल भडकवण्याचं उद्धव ठाकरेंनी प्लॅनिंग केलं होतं, भाजप आमदार राणे यांचा गंभीर आरोप

0

उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांवर टीका करण्याची राणे कुटुंबीय एकही संधी सोडताना दिसून येत नाहीत अशातच मागच्या काही दिवसापासून राणे कुटुंबीय सतत उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरेंवर टीका कारण दिसून येत आहेत. आता पुन्हा एकदा आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केला आहे. १९९३ च्या दंगली जशा घडल्या तशीच दंगल आपल्याला घडवायची आहे. उद्धव ठाकरेंनी त्या बैठकीत संबंधित पदाधिकाऱ्यांना चर्नीरोड परिसरातील मुस्लिम फेरिवाल्यांवर हल्ला करावा, त्यानंतर दंगली भडकवण्याची जबाबदारी माझी असेल असं बैठकीत उद्धव ठाकरे म्हणाले होते.

तसेच दंगलीचा फायदा घेऊन मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न त्यांचे होते असा मोठा दावा भाजपा आमदार नितेश राणेंनी केला आहे.आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, उद्धव ठाकरे सातत्याने दंगली भडकवण्याचा आरोप करतायेत. ९ महिन्यापासून आमच्या सरकारवर असे आरोप करतात पण १३ ऑगस्ट २००४ मातोश्रीत एक बैठक झाली. त्या बैठकीत स्थानिक लोकाधिकारी समितीचे सरचिटणीस आणि एक खासदार जे आता शिंदेंसोबत आहेत. त्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी दंगली घडवण्याचं प्लॅनिंग केले होते असा आरोप त्यांनी केला.

तसेच ९ महिने महाराष्ट्रात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न होतोय त्यात उद्धव ठाकरे आणि टोळीचा हात आहे का याची चौकशी गृहखात्याने केली पाहिजे. मालवणी, छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या घटनेत उद्धव ठाकरेंचा हात आहे का याची चौकशी करावी. १९९९ पासून आजपर्यंत उद्धव ठाकरे सातत्याने मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न पाहतायेत. उद्धव ठाकरे हा किती कपटी आहे, हे मी तारखेसकट आणि पुराव्यासकट बोलतोय. राज्यात दंगल घडली तर त्याला जबाबदार उद्धव ठाकरेंनाच धरले पाहिजे अशी मागणीही आमदार नितेश राणेंनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.