Latest Marathi News

BREAKING NEWS

‘या’ दाम्पत्याच्या हस्ते करण्यात आले अन्नपूर्णा महाप्रसादाचे पूजन…!

0

बार्शी |

मातृभूमी प्रतिष्ठानच्या मार्फत महत्त्वपूर्ण अशी अन्नपूर्णा योजना चालवली जाते या योजनेचे पूजन १० मे रोजी मातृभूमीचे संचालक राजकमल हेड्डा यांच्या कुटुंबीयांच्या हस्ते करण्यात आले. राजकमल हेड्डा हे महालक्ष्मी ट्रेडर्स चे सर्वेसर्वा आहेत, आज चार्टस अकाउंटंट आनंद हेड्डा यांचा वाढदिवस त्यानिमित्त हेड्डा कुटुंबीयांच्या वतीने पूजन करण्यात आले, त्याचबरोबर ग्रामीण रुग्णालय बार्शीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. शितल भोपलकर व त्यांचे पती आशिष बोपलकर यांनीही अन्नपूर्णा योजनेचे पूजन केले आणि बार्शी शहरातील उद्योजक म्हणून ओळख असणारे पियुष बलदोटा यांच्या हस्ते योजनेचे पूजन करण्यात आले. वरील तिन्ही कुटुंबीयांचा सामाजिक कार्यामध्ये महत्त्वपूर्ण वाटा असतो.

गेल्या सात वर्षापासून बार्शी शहरांमध्ये मातृभूमी प्रतिष्ठान संचलित अन्नपूर्णा योजना ही समाजातील दातृत्व जतन करणाऱ्या विविध क्षेत्रातील दानशूर यांच्या मदतीने अविरतपणे सुरू आहे, प्रत्येक दिवशी २०० पेक्षा जास्त समाजातील गरजू, निराधार, वंचित लोकांना दोन वेळचे अन्न घरपोच केले जाते. बार्शी शहरातील मोठ्या हॉस्पिटलमध्येही रुग्णासोबत आलेल्या नातेवाईकांना जेवण्याची सोय व्हावी म्हणून अल्प दरात भोजन पुरवले जाते. मातृभूमी पॅटर्न हा महाराष्ट्रभर सर्वपरिचित होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.