Latest Marathi News

BREAKING NEWS

ऑक्सिमीटरद्वारे कोरोनाची जलद चाचणी? वाचा करमाळा तालुक्यातील नियोजन

0

करमाळा शहरात ऑक्सीमीटर तपासणी केंद्र सुरु – नगराध्यक्ष वैभवराजे जगताप

करमाळा : करमाळा नगरपरिषदेकडून सर्व करमाळा नगरपरिषद शाळांमध्ये दर सोमवार व गुरुवारी सकाळी १० ते १२ या वेळेत ऑक्सीमीटर व थर्मामीटर तपासणी केंद्र सुरु करण्यात येत आहेत. करमाळा शहरातील नागरिक गेल्या चार महिन्यांपासून कोरोनाशी लढा देत आहोत. अद्याप तरी कोरोनामुक्त् राहण्यास यशस्वी झालो आहोत. सध्या जिंतीतील १० रुग्ण आहेत.कोरोनाने तालुक्यात प्रवेश केला म्हणून सावध व सतर्क राहणे गरजेचे आहे.

सर्व वृध्द नागरिक व विविध आजार असलेल्या व्यक्तीकरीता करमाळा शहरात सर्व नगरपरिषद शाळा तसेच इतर उत्सुक शाळा येथे ऑक्सीजन तपासणीकरीता ऑक्सीमीटर तपासणी केंद्र सुरु करणार आहोत. सदर केंद्र दर सोमवार व गुरुवार सकाळी १० ते १२ या वेळेत शाळेतील मुख्याध्यापक यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व महिला शिक्षिका ऑक्सीमीटर तपासणी करणार आहेत. ऑक्सीमीटर तपासणी वृध्द व दुर्धर आजाराने त्रस्त व्यक्तींकरिता सुविधा देण्यात येणार आहे.

ऑक्सीमीटर तपासणीमध्ये काय तपासले जाते

शरीरातील रक्तामधील ऑक्सिजनचे प्रमाण SOP% तपासले जाते. शरिरातील ऑक्सिजन ९५% पेक्षा जास्त् असणे निरोगी शरीराचे लक्षण आहे. मात्र ९५ पेक्षा कमी ऑक्सीजन प्रमाण असल्यास आपण कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर पुढील वैद्यकिय उपचार घेणे अपेक्षित आहे. दमा, श्वसनाचे आजार असलेल्याचे हे प्रमाण ९० ते ९५% असते. अशाचे प्रमाण ९०% पेक्षा कमी झाल्यास त्यांना देखील कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर पुढील वैद्यकिय उपचार घेणे अपेक्षित आहे.

आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या काही केसचा अभ्यास केल्यास कसलाही त्रास नसलेल्या काही व्यक्तींचा ऑक्सीजन प्रमाण ५०% ते ६०% आढळले. मात्र त्यांना तोपर्यंत कसलाही त्रास जाणवत नव्हता. त्यांचे सुरळीत आयुष्य सुरु होते यालाच ‘हॅपी हॅप्पोझीया’ असे म्हटले जाते. मात्र अगदी शेवटच्या क्षणी ऑक्सीजनचे प्रमाण कमी झाल्यानंतर सदर पेशंट ॲडमीट झाले व अशांचा मृत्यूदर अधिक आहे. त्यामुळेच वारंवार सर्व वृध्द व आजारी व्यक्तींनी आपले ऑक्सीजनचे प्रमाण ऑक्सीमीटरने तपासून घेणे अत्यंत गरजेचे आहे.

त्याकरीता करामळ्यात सर्व नगरपरिषद शाळेत ऑक्सीमीटर तपासणी केंद्र सुरु करणार आहेत. त्यांच्या प्रभागातील वृध्द आजारी व्यक्तींनी जवळच्या शाळेत जावून ऑक्सीमीटरने ऑक्सीजन प्रमाण तपासून घ्यावे. तपासणीकरीता जाताना मास्क लावणे, तपासणी आधी व नंतर साबणाने हात स्वचछ धुणे व सॅनिटायझर लावणे. हात निर्जंतुक करणे व सुरक्षित अंतर राखून तपासणी पार पाडणे आवश्यक आहे.

ऑक्सीमीटर हे सध्या खुप स्वस्त व कमी किंमतीत सर्व मेडिकल मध्ये उपलब्ध आहे तरी ज्यांना स्वत:ला हे ऑक्सीमीटर आपल्या कुटूंबासाठी खरेदी करणे शक्य आहे त्यांनी ऑक्सीमीटर स्वत:च्या घरी आणणे फायद्याचे ठरणार आहे. या यंत्रामध्ये आपले बोट ठेवून ऑक्सीजनचे प्रमाण आपल्याला कळते.

याचप्रमाणे सेफीया २०० या कोरोना नियंत्रणात आणण्याच्या होमीओपॅथिक औषधाची फवारणी घरोघरी झाल्यास प्रत्येक कुटूंबाला फायदा होणार आहे. सदर सेपीया – २०० या द्रावणाकरीता डॉ.बिपिन परदेशी यांच्याकडे संपर्क साधवा असे आवाहान करण्यात येत आहे.

सर्व वृध्द व आजारी व्यक्तीनी करमाळा न.प. शाळेत ऑक्सीमीटरने ऑक्सीजन तपासणी करुन घ्यावी. सर्व नियम पाळावेत व कोरोनामुक्त रहावे

नगराध्यक्ष वैभवराजे जगताप.

ऑक्सीमीटर तपासणीत ९५% पेक्षा कमी ऑक्सीजनचे प्रमाण आढळल्यास पुढील तपासणीकरीता कुटीर रुग्णालयाकडे सदर नागरिकांना पाठवून योग्य औषधउपचार संबंधित नागरिकांवर करण्यात येणार आहेत.

मुख्याधिकारी वीणा पवार.

प्रतिनिधी दिनेश मडके

Leave A Reply

Your email address will not be published.