Latest Marathi News

BREAKING NEWS

.तर तोच कांदा तुमच्या तोंडावर हाणून मारणार; गुलाबराव पाटलांचा राऊतांवर निशाणा

0

माळजवत रविवारी पार पडलेल्या सभेमध्ये शिवसेना (ठाकरे) गटाचे खासदार संजय रूपात यांनी शिंदे गटावर आणि त्यांच्या सोबत गेलेल्या ४० आमदारावर जोरदार निशाणा साधला होता. आता या टीकेला शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी सडेतोड प्रतिउत्तर दिले आहे. संजय राऊत यांनी आम्ही दिलेली मते परत करावी. त्यानंतर आमच्यावर टीका करावी. अन्यथा तोच कांदा तुमच्या तोंडावर फेकून मारू अशी प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊतांच्या टीकेवर दिली आहे.

जळगाव तालुक्यातील वावडदा येथे शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विविध कामांचे भूमिपूजनाचा सोहळा पार पडला यनावेही उपस्थित पत्रकार बांधवांशी संवाद साधताना गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत विरोधात संतप्त प्रतिक्रिया दिली आहे गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांचा अरे मिंधे असा एकेरी शब्दात उल्लेख केला. आम्ही दिलेले आधी मत पुन्हा कर. त्यानंतर गुलाबराव पाटील यांच्यावर टीका कर नाहीतर तोच कांदा तुझ्या तोंडावर हाणून मारीन अशा आक्रमक शब्दात मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले.

गुलाबराव पाटील म्हणाले की, संजय राऊत यांच्यासारख्या माणसाला माझ्यावर टीका करावी लागते म्हणजे मी छोटा माणूस नाही. दगड कोणत्या झाडाला मारले जातात की ज्याला फळ आहेत, मला फळ लागली आहेत त्यामुळेच राऊत माझ्यावर टीका करत आहेत असेही मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.

मालेगावात रविवारी उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली या सभेत संजय राऊत यांनी शेतकऱ्यांना भावना देणारे कांदे तसेच शिंदे व गुलाबराव पाटील यांना रस्त्यावर फेकण्याची वेळ आली आहे अशी टीका केली होती या टीकेवर मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर देत संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.