Latest Marathi News

BREAKING NEWS

स्वातंत्र्य: दिनादिवशी शिक्षकाने पाकिस्तान झिंदाबादचा ठेवला स्टेटस

0

 

कोल्हापुरातील हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे येथे मोठे इंटरनॅशनल शाळा आहे. त्या शाळेत जम्मूतील एक शिक्षक शिकवत आहे. त्या शिक्षकाने आपल्या मोबाईलवर पाकिस्तान झिंदाबाद, असा स्टेटस लावला होता. याची दखल घेत संबंधित शिक्षकावर हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
हातकणंगले पोलिसांनी शिक्षकाला ताब्यात घेतले आहे.

कोल्हापूर- सांगली मार्गावरील अतिग्रे येथील एका इंटरनॅशनल स्कूलमध्ये तो शिक्षक होता. त्याच्या या गैरप्रकारानंतर शालेय प्रशासनाने त्याची तात्काळ काढून टाकण्यात आले आहे. यापूर्वी ५ ऑगस्ट रोजी या शिक्षकाने जम्मू – काश्मिर ब्लॅक डे असा स्टेटस ठेवल्याची महिती समोर आली होती. दरम्यान तो स्टेटस व्हायरल झाल्यानंतर जिल्हा पोलीस प्रमुख व स्थानिक गुन्हे शाखा पथक पोलिसांनी तात्काळ हालचाली करत या शिक्षकाला ताब्यात घेतले.

मात्र या घटनेबाबत स्थानिक पोलिसांना कोणती खबरही नव्हती. संबधीत शिक्षकावर वरिष्ठाच्या आदेशानंतर हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दाखल गुन्ह्याची माहिती देण्यास पोलिसांकडून टाळाटाळ सूरू होती. या वादग्रस्त शिक्षकाविरुद्ध विद्यार्थी व पालकांनी प्राचार्य व संस्था चालकांकडे तक्रार दाखल केली आहे. या शिक्षकाची शालेय प्रशासनाने तात्काळ हाकालपट्टी केली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.