कोल्हापूर । राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादीत शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट तयार झाले होते अशातच या बंडखोरीनंतर शरद पवारांनी बंडखोरांच्या मतदार संघात थेट जाहीर सभा घेत जाहीर आवाहन दिले होते अशातच दोनच दिवसांपूर्वी शरद पवारांची कोल्हापुरातील दसरा चौकात सभा पार पडली. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा अजित पवार गटावर निशाणा साधला होता.
आज शरद पवारच्या सभेनंतर प्रतिउत्तर देण्यासाठी येणाऱ्या काही दिवसात जोल्हापुरात अजितदादांची जाहीर सभा पार पडणार आहे अशी माहिती समोर येत आहे कोल्हापूर गारगोटी मार्गावर वरील कळंबा नजदिक तपोवन मैदानात ही सभा पार पडणार आहे याच मैदानात काहीदिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शासन आपल्या दारी हा कार्यक्रम पार पडला होता.
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सभेला ५० हजारहून अधिक लोक उपस्थित राहतील, असा विश्वास श्री. पाटील यांनी व्यक्त केला. या सभेला पक्षाचे सर्व मंत्री, आमदार उपस्थित रहाणार असून नागरिकांनीही उपस्थित रहावे, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.
या सभेसंदर्भात माहिती देताना जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील म्हणाले की, तीन दिवसांपूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची सभा कोल्हापुरात झाली. त्या सभेला उत्तर देण्यासाठी ही सभा नाही. नुकत्याच झालेल्या स्वातंत्र्यदिनाच्या झेंडावंदनासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापुरात आले होते. परंतु, आम्ही त्यांचा सत्कार करू शकलो नव्हतो. म्हणून त्यांच्या सत्कारासाठी ही सभा होत असल्याचे श्री. पाटील यांनी म्हटले आहे.
‘राष्ट्रवादीला धक्का खडसेंसोबत राष्ट्र्वादीत गेलेल्या पाच नेत्यांची पुन्हा भाजपात घरवापसी’
आगामी निवडणुकांमध्ये जागा वाटपात दोन लोकसभा आणि दहा विधानसभेच्या जागेची आठवले गटाची मागणी