Latest Marathi News

BREAKING NEWS

पुण्यात तरुणीवर कोयता हल्ल्यानंतर पोलीस आयुक्तांची कारवाई; तीन पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन

0

पुणे |

पुण्यातील सदाशिव पेठेत तरुणीवर झालेल्या हल्ला प्रकरणी आता पोलीस हवालदारासह तीन जणांना निलंबित करण्यात आलं आहे. विश्रामबाग पोलीस ठाण्याअंतर्गत पेरुगेट चौकीतील पोलीस हवालदारासह तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या तीन पोलीस कर्मचाऱ्यांवर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला.

पोलीस हवालदार सुनील शांताराम ताठे, पोलीस कर्मचारी प्रशांत प्रकाश जगदाळे आणि सागर नामदेव राणे अशी निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. हल्ल्याच्या वेळी हाकेच्या अंतरावर असलेल्या पेरुगेट पोलीस चौकीत एकही पोलीस कर्मचारी उपस्थितीत नव्हता. तसंच बीट मार्शल यांनी देखील घटनास्थळी यायला 20 मिनिटं लावली. यामुळे ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त संदीप गिल यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.