‘सनी’ हा मराठी चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटाचं दिग्दर्शन हेमंत ढोमे यानं केलं आहे. हेमंतनं काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. त्याच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले. हेमंत ढोमेने प्रेक्षकांच्या तिकिटाचे पैसे परत केल्याच्या मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर करत ट्वीट केलं. त्यानं ट्वीटमध्ये लिहिलं, ‘पुन्हा एकदा महाराष्ट्रात मराठी चित्रपटांची गळचेपी.
या राज्यात मराठी सिनेमासाठी जर आता एक शो मिळवायला झगडावं लागत असेल तर कठीण आहे. शुक्रवारी लागलेला सिनेमा दुसऱ्या दिवशी निघतोय. लोक ‘सनी’ या सिनेमाची तिकीटं काढत आहेत. पण शोज कॅन्सल केले जात आहेत”. आता या चित्रपटातील कलाकार चिन्मय मांडलेकर आणि ललित प्रभाकर यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सनी चित्रपटाचे शो रद्द झाल्यानं संताप व्यक्त केला आहे.
चिन्मयनं सोशल मीडियावर काही बातम्यांचे स्क्रिनशॉर्ट शेअर केले आहेत. या पोस्टला चिन्मयनं कॅप्शन दिलं, ‘इतके दिवस ते म्हणत होते कि लोकंच येत नाहीत. आता बुकिंग केलेल्या प्रेक्षकांना मेसेज जातायत की तुमचं बुकिंग कॅन्सल पैसे परत घ्या. बनवणाऱ्यांनी चित्रपट बनवला, ज्यांनी पाहिला त्यांना आवडला ही आहे, आणखी लोकांना पाहायचा आहे. मग ही मधली लोकं कोण ? असा सवाल उपस्थित केला आहे.