Latest Marathi News

BREAKING NEWS

उद्धव ठाकरेंसोबत युती करायची की नाही हा निर्णय…;

0

काही दिवसांपासून वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गटाची युती होण्याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. २० नोव्हेंबरला उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर ‘प्रबोधनकार ठाकरे डॉट कॉम’ या संकेतस्थळाच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्ताने एकत्र आल्यानंतर या चर्चांना पुन्हा उधाण आले. यावर वंचित बहुजन विकास आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली.

महाराष्ट्रातील राज्य हे सध्या स्टे ऑर्डरवर चाललेलं सरकार आहे. त्यामुळं सर्वोच्च न्यायालयानं स्टे ऑर्डर पिटीशनवर ठरवावं, अशी विनंती आंबेडकर यांनी केली. याशिवाय राहिला प्रश्न शिवसेना-भीमशक्ती एकत्र येण्याचा तर ते निवडणुका केव्हा जाहीर होतात. त्यावर अवलंबून असल्याचं त्यांनी सांगितले. त्यामुळे प्रकाश आंबेकर यांनी ठाकरे गटाबरोबर युती संदर्भात वेट अँड वॉच ची भूमिका घेतली आहे.

प्रबोधनकार.कॉम या संकेतस्थळाच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर हे एकत्र आले. उद्धव ठाकरे यांनी युतीचे संकेत दिलेत. आपल्या देशात लोकशाही टिकणार की नाही. याचा विचार करावा. यानिमित्तानं आपण एकत्र आलो आहोत. प्रकाशजी आपल्याला हे काम करावचं लागेल. नुसत लोकांना जाग करून उपयोग नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.