Latest Marathi News

BREAKING NEWS

भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामींचा भाजपलाच अल्टीमेटम..!!

0

मुंबई : भाजपाचे नेते सुब्रमण्यम स्वामी आपल्या स्पष्ट बोलण्यासाठी संपूर्ण देशात ओळखले जातात. कित्येक वेळा माध्यमांच्या मंचावरून त्यांनी स्वपक्षाची खरडपट्टी काढली आहे. अर्थव्यवस्थेच्या अवस्थेवरून त्यांनी अनेकदा केंद्र सरकारचे कान उपटले आहेत. त्यांच्या याच स्पष्टवक्ता स्वभावामुळे भाजपाच्या आयटी सेलकडून त्यांची ट्रोलींग होत आहे. त्यामुळे सुब्रमण्यम स्वामी यांनी स्वतःच्या पक्षालाच अल्टीमेटम दिला आहे. आयटी सेलप्रमुख अमित मालविय यांना गुरुवारपर्यंत हटविण्यात यावे, अशी मागणी भाजप नेते स्वामी यांनी ट्विटरद्वारे केली आहे.

देशाची आर्थिक स्थिती, सुरक्षा आणि विविध सामाजिक विषयांवर परखडपणे भाष्य करणारे नेते म्हणून स्वामी यांची ओळख आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांवर ते उघडपणे टीका करतात. याबद्दल भाजपच्या आयटी सेलमधील काही लोक बनावट आयडीकरून ट्रोल करत असल्याने स्वामी कमालीचे वैतागले आहेत. याप्रकरणी सोमवारी सर्वप्रथम ट्विट करत त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतरही सोशल मीडियातील हल्ले सुरूच राहिल्याने बुधवारी स्वामी यांनी थेट पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्याकडे दाद मागितली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.